आपली
प्रतिक्रिया
।
पुस्तक
सुचवा ।
मदत करा |
या प्रकल्पाचे वाढते स्वरूप लक्षात घेता
त्याच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी स्थायी
यंत्रणा उभी करावी लागणार आहे. त्यासाठी
व्यक्तिगत आणि संस्थात्मक पातळीवरील
अर्थसाहाय्य लागेल. मराठी समाजाचे भाषिक
सांस्कृतिक संचित जतन करण्याचा हा अभिनव
प्रयोग आहे. एका अर्थाने येत्या काळातल्या
विधायक मराठीकारणाचा तो पाया आहे असे म्हणता
येईल. त्यासाठी मराठी समाजाला सहकार्याचे
आवाहन करीत आहोत. |
अपेक्षित मदत व मदत करणार्यांना त्याचे
फायदे. |
-
आर्थिक मदत
ही मदत करणारे, आर्थिक मदत करुन कुठल्याही
पुस्तकाची निर्मिती करु शकतील. ज्यांनी अशी
मदत केली त्यांचे ऋण त्या ई-पुस्तकात मांडले
जातील. हे ऋण जाहिरात स्वरुपाचे नसले तरी लोक
ते वाचतील असे लिहिले जातील. यामुळे दात्याचे
नाव नेहमीच लक्षात राहील. ही मदत मिळाल्यावर
ई-पुस्तकाची निर्मिती व्यावसायिकांकडून केली
जाईल व त्यावर येणार्या खर्चाची पोचपावती
दिली जाईल. याशिवाय माहितीजालावरील
संकेतस्थळासाटी
(website)
किंवा व्यवस्थापन खर्चासाठी मदत करता येईल.
ही मदत करणार्यांचे ऋणनिर्देश संकेतस्थळी
दिले जातील.
|
-
निर्मित्तीत सहभाग
निर्मितीत सहभाग करुन एखाद्या पुस्त्काची
निर्मिती करणे हे या चळवळीतले मुख्य कार्य
आहे. तेव्हा अशा सहभागी सदस्यांचे ऋणनिर्देश
ई-पुस्तकात विशेष करून दिले जातील. त्यांच्या
छायाचित्रासोबत हे ऋणनिर्देश केले जातील.
|
-
पुस्तके निवडणे व उपलब्ध करुन देणे
हे महत्वाचे कार्य करणार्यांचे ऋणनिर्देश
ई-पुस्तकात व/वा संकेतस्थळी दिले जातील.
यासाठी, ई-पत्र, दूरध्वनी वा प्रत्यक्ष
भेटीद्वारे मदत अपेक्षित आहे.
|
आपली
प्रतिक्रिया
।
पुस्तक
सुचवा ।
मदत करा |